महाभारताचा प्रभाव आणि प्रेरणा

संजय बजाबा गोर्डे

Abstract


सर्व विषयांना व्यापून दशांमुळे उरणारे असे आर्ष महाकाव्य म्हणजे महाभारत होय। साधारण पाच हजार वर्षांपूर्वी व्यासांनी सांगितलेले हे महाभारत आजही समकालीनच वाटते। प्राचीन भारताचा राजकीय, धार्मिक, सामाजिक, वांशिक, भाषिक, तत्त्वज्ञानात्मक इतिहास, चरित्रेतिहास तसेच अनेक कथा, गाथा, आख्याने, उपाख्याने, मिथके अशा अनेकविध ताण्याबाण्यांनी विणलेले हे काव्य आजही नित्यनूतन वाटते।

            सांप्रतच्या समाजाला योग्य मार्ग दाखविण्याची महाभारताची क्षमता आजही टिकून आहे। त्यामुळेच ते ग्रामीण, आदिम, नागर सर्व परंपरांत खोलवर रुजलेले पाहावयास मिळते। काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या षड्रिपूंच्या आहारी जाऊन मानवजात जो पर्यंत स्वतःचा Åहास ओढवून घेत राहील तोपर्यंत महाभारत कधीच जुने वा शिळे होऊ शकणार नाही असे वाटते। महाभारत आजही व्यक्ती आणि समष्टीला दिशा देणारा दीपस्तंभ ठरतो।


Full Text:

PDF

References


१। शोभणे रविंद्र, 'महाभारत आणि मराठी कादंबरी', विजय प्रकाशन, सीताबर्डी, नागपूर, प्र।आ। मे २०१२, पृ।क्र।७।

२। पणशीकर दाजी, 'कर्ण खरा कोण होता?' प्रस्तावना, रविराज प्रकाशन, पुणे, सहावी आवृत्ती, पृ।क्र।१७।

३। मंचरकर र।बा।, 'तौलनिक साहित्य आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १ मे २०१३, पृ।क्र।१३२।

४। गिरधारी भास्कर, 'मराठी साहित्यातील ययाती', विभा प्रकाशन, नाशिक, प्र।आ। १९८९, पृ।क्र।९२।

५। ढेरे अरूणा, 'भारती कथेची समकालीनता!', संवादसेतू दिवाळी अंक, २०१७, पृ।क्र।१४४।

६। तत्रैव, पृ।क्र।१४४।

७। आठवले अनंतराव, 'महाभारताचे मारेकरी', केसरी दिवाळी अंक, १९६८, पृ।क्र।२६।

८। शोभणे रविंद्र, 'महाभारताचा मूल्यवेध', विजय प्रकाशन, सीताबर्डी, नागपूर, प्र।आ। जानेवारी २०१०, पृ।क्र।२११।


Refbacks

  • There are currently no refbacks.